helpline
Home

Asthama

1) What is Asthma?

Answer : Due to certain allergic elements in the air (Dust, Fumes, Cold-Drinks, icecream, cold weather. Rainy Season, Good night Mat, Mortein, pollen grains, body Spray, Cat-dog hairs etc.) the airway becomes inflamed and patient becomes breathless ( Difficulty in breathing) it is called asthma.


2) What are signs & symptoms of asthma?

Answer: Persistent cough. Difficulty in. breathing. Noisy breathing. Seasonal cough.


3) What is the percentage of asthma in Indian Children?

Answer: Almost 30-40 percent of children in urban as well as in rural area have asthma.


4) What precaution can be taken to avoid asthma?

Answer: If we avoid contact with allergic substances for ( e.g. Dust, Fumes. Cold-drinks, Spray, Cold Weather, etc.) we can avoid asthma.


5) Whether asthma is hereditary disease?

Answer: Yes - if parents or Grand parents of the child are having asthma there are high chances of asthma in the child.


6) Whether asthma is a contageous diseases?

Answer: No- Asthma is not a contageous disease that means coming in contact with asthma patient dose not cause asthma.


7) How can we diagnose asthma? Is there any particular test to diagnose it?

Answer: No- There is no particular test to diagnose asthma but it can be diagnosed by its signs and symptoms by your doctor.


8) What is the specific treatment of asthma?

Answer: Inhalation therapy (Drug delivered by pump and mask or Nebulization) is the treatment of asthma.


9) Whether inhalation therapy causes habituation?

Answer: No- inhalation therapy does not cause any habituation.


10) Are there any side effects of inhalation therapy?

Answer: No-There are practically no side effects of inhalation therapy because the dose of drug delivered by inhalation is very minimal.


ll) If we don't give inhalation therapy at right time, what is the disadvantage to the patient?

Answer: If we don't start inhalation therapy at right time patient may have asthma for life long period.


12) Inhalation therapy demonstration?

Answer : As per Video ( Asthma CD.No.l and Asthma CD.No.2) ( Kindly ask for CD.No.l and CD.No.2 - free from Doctor - on Temparary basis)

१) बाल दमा म्हणजे काय ?

उत्तर : हवेतील अँलर्जीक घटकामुळे (उदा. धूर, धूळ, थंड पदार्थ, आईस्क्रिम, कोल्ड ड्रिंक, थंड हवा, ढगाळ वातावरण, स्प्रे, कुत्रा - मांजराचे केस, फुलांचे पराग कण, बंबाचा धूर, शेक शेगडी गुड नाईट मँट, लिक्विड, माँर्टिन / कासव छाप क्वाँईलचा धूर) श्वासनलिकेला तात्पुरती सूज येते व श्वास घ्यायला त्रास होतो- धाप लागते यालाच बाल दमा म्हणतात.


२) बाल दमाची लक्षणे कोणती ?

उत्तर : खोकला , धाप - श्वासाची गती वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे. ठराविक सीझनमध्ये होणारा खोकला. तसेच अँलर्जीक पदार्थाच्या सानिध्यात आल्याने होणारा खोकला.


३) किती टक्के मुलांना दमा होतो?

उत्तर : वारंवार खोकण्यार्‍या मुलांमध्ये जवळ जवळ ३० -४० टक्के मुलांना बाल दम्याची लक्षणे दिसतात.


४) बाल दमा टाळता येतो का किंवा तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

उत्तर: उत्तर क्र १ मध्ये नमूद केलेले अँलर्जीक घटक (उदा. धूर, धूळ, थंड पदार्थ,....इत्यादीचा) संपर्क टाळल्यास आपण बाल दमा टालू शकतो किंवा त्याचे प्रमाण आटोक्यात आणता येते.


५) बाल दमा आनुवंशिक आहे का?

उत्तर : बाळाच्या आई - वडिलांना किंवा आजी - आजोबांना बाल दमा असल्यास अनुवंशिकरित्या तो बाळाला होण्याची शक्यता असते - होईलच असे नाही.


६) बाल दमा संसर्गजन्य आहे का ?

उत्तर : नाही, बाल दमा हा संसर्गजन्य आजार नाही म्हणजे निव्वळ बाल दमा असणार्‍या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तो दुसर्‍या व्यक्तीला होऊ शकत नाही.


७) बाल दम्याचे निदान कसे करता येते, त्यासाठी टेस्ट आहेत का ?

उत्तर : बाल दम्याच्या निदानासाठी निश्चित अशी कोणतीही टेस्ट नाही. बाल दम्याचे निदान हे उत्तर क्रमांक २ मध्ये नमुद केलेल्या लक्षणाने होते.


८) बाल दम्याची ट्रिट्मेंट काय आहे?

उत्तर : बाल दमामध्ये इन्हेलेशन थेरपी ( पंपाव्दारे फवार्‍याच्या स्वरुपात दिली जाणारी औषधे) हिच महत्वाची ट्रिट्मेंट आहे.


९) इन्हेलेशन ( पंपाव्दारे औषधांचा स्प्रे) थेरपीमुळे सवय लागते का?

उत्तर : इन्हेलेशन थेरपीमुळे कोणतीही सवय लागत नाही. उलट त्याचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर केल्यास पेंशटला फायदाच होतो.


१०) इन्हेलेशन ( पंपाव्दारे औषधांचा स्प्रे) थेरपीचे साईड इफेक्टस आहेत का ?

उत्तर : इन्हेलेशन थेरपी व्दारे दिल्या जाणार्‍या औषधांचा डोस हा तोंडावाटे दिल्या जाणार्‍या औषंधापेक्षा ( उदा. कफ सिरप, स्टिराँईडस इ.) कित्येक पटीनी कमी असतो. त्यामुळे त्याचे साईड इफेक्टस नगण्य आहेत. उलट पंपाव्दारे दिले जाणारे औषध डायरेक्ट श्वसन मार्गापर्यत पोहोचत असल्यामुळे त्याचा परिणाम ताबडतोब दिसून येतो व तोंडाव्दारे दिल्या जाणार्‍या कफ सिरप पेक्षा त्याचा जास्त फायदा होतो.


११) इन्हेलेशन थेरपी ( पंपाव्दारे औषधांचा स्प्रे) न दिल्यास काय तोटा होतो ?

उत्तर : प्रत्येक वेळी जेव्हा बाल दम्याचा अँटँक येतो, तेव्हा श्वास नलिके्चा मार्ग अरुंद होतो. अशा प्रकारे प्रत्येक वेळी श्वास नलिका थोडी थोडी अरुंद होत गेल्यास बर्‍याच वर्षानी ती कायमस्वरुपी अरुंद होते व मोठेपणी बाल दमा राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रत्येक बाळाला दम्याच्या अँटँकच्या वेळी इन्हेलेशन थेरपी (पंप) वापर केल्यास वारंवार होणारा त्रास, त्याची तीव्रता मोठेपणी राहणारा दमा टाळता येतो.


१२) इन्हेलेशन थेरपी डेमो

उत्तर व्हिडिओव्दारे (CD No. 1 And CD No. 2) (डाँक्टरांकडे या सी. डी. ची मागणी करावी, ही सी.डी तात्पुरती पाहण्यास मोफत दिली जाईल.)